या जगात कोणतीच गोष्ट सहजासहजी साध्य होत नसते. एका रात्रीत चमत्कार व्हावा आणि मनातील स्वप्न सत्यात उतरावे अशी जादूची कांडी या जगात तरी अद्यापपर्यंत अस्तित्वात नाही. कोणतेही स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्या पाठीमागे खूप मोठा त्याग, संघर्ष, तपस्या, आरोप-प्रत्यारोप, विरोध, मान-अपमान या सगळ्या दिव्यांतून मनुष्यास जावे लागते.
”अग्नित होरपळून जसे पोलादाचे बनते शस्त्र,
परिस्थितीत होरपळून तसे काव्य कवीचे बनते अस्त्र“
कर्तृत्वाची छाप सोडायची असेल तर अपयशाची धाप लागता कामा नये. परिस्थिती कितीही बिकट असली तरी ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश खेचून आणता आलं पाहिजे. संघर्षातून जे अस्तित्व निर्माण होते ते चिरकाल टिकणारे असते. अपमानाची भणक लागल्याशिवाय यशाची सणक डोक्यात जात नाही हे ही तितकचं सत्य. शस्त्रांनी युद्ध जिंकता येत असलं तरी इतिहास हा लेखणीनेच लिहिला जातो. लेखणी धारधार असेल तर ती वाचक वर्गांच्या हृदयावर अनंतकाळपर्यंत अधिराज्य गाजवत असते.
सदर चारोळीसंग्रहामध्ये एकास एक वरचढ अशा सुरेख चारोळ्यांनी खचाखच भरलेली पानेच नाहीत तर अगदी अंतर्मनातून व्यक्त झालेली रसिक मित्रांची मने ही आहेत. पोलीस खात्यातील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाÚयांनी त्यांच्या स्वतःच्या शब्दात दिलेले शुभेच्छा संदेश हे लाख मोलाचे आहेत आणि ही शब्ददौलत लाखो रूपये खर्चून देखील कुठेच भेटणार नाही. ”खाकी वर्दीतील दर्दी कवी“ या काव्यसंग्रहाच्या तुफान यशानंतर खास रसिक मित्रांसाठी निखळ आनंद देणारा एक-दोन नव्हे तर तब्बल 268 स्वरचित चारोळ्यांचा भव्य दिव्य असा ”खाकी वर्दीतील दर्दी कवीच्या लेखणीतून“ हा चारोळीसंग्रह रसिक मित्रांच्या दिमतीस सादर करत आहे.
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
Khaki Varditil Dardi Kavichya Lekhanitun
Self Help, Motivational, Inspirational, Confidence Building & Human Values,
khaki vardi dardi kavi, marathi charoli, charoli in marathi, love poetry marathi, inspirational marathi poems, motivational marathi poems, marathi poetry book
MRP:
₹300
₹250
(17% off)
Minimum Purchase: ₹1,600
Format: | Paperback |
---|---|
ISBN No. | 9789391041052 |
Publication date: | 14 May 2021 |
Publisher: | Rigi Publication |
Publication City/Country: | India |
Language: | Marathi & Hindi |
Book Pages: | 108 |
Book Size: | 5.5" x 8.5" |
Book Interior: |