ह्या कवितासंग्रहातील प्रत्येक ओळ राधेकृष्णच्या प्रेमाने भरलेली आहे. हा कवितासंग्रह संपूर्णतः प्रेमरसाने भरलेला, निर्मळ आणि निजप्रेमानी व्याप्त आहे. फक्त चार ओळीत मी "शारंग प्रेम" या पुस्तकाबद्दल सांगू पहातो.
आठवण होई मज राधे कृष्णाची,
संग्रहातील ओळ वाचुनी…
अर्थ लावतो मी बापुडा,
परि थांग न लागे ह्या शारंग प्रेमाची…
About the Author:
कवी भावेश मेस्त्री उर्फ शारंग यांचा जन्म २४ सप्टेंबर १९८५ साली मुंबईला झाला. संपूर्ण शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर नोकरीसाठी ते पुण्यात स्थायिक झाले. टाटा मोटर्स, जेसीबी अशा नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी चांगल्या पदावर काम केले. ९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी काही नाटकांमध्ये कामपण केले. मोठ्या बहिणीमुळे त्यांना साहित्याची आवड झाली आणि ते शाळेपासून लहान अश्या कविता लिहू लागले. शारंग हे नाव त्यांनी प्रथमच ह्या पुस्तकाच्या माध्यमातून धारण केले आहे.